नशिराबाद,आसोदा आणि जळगावातून प्रत्येकी एक जण बेपत्ता

नशिराबाद,आसोदा आणि जळगावातून प्रत्येकी एक जण बेपत्ता
Published on: 
जळगाव, नशिराबाद, आसोदा येथून प्रत्येकी एक जण बेपत्ता सकाळ वृत्तसेवा नशिराबाद, ता. ७ : नशिराबाद येथून वीस वर्षीय तरुण पार्सल घ्यायला गेला, तो अद्याप परतला नाही. आसोदा येथून ४१ वर्षीय गृहस्थ बेपत्ता झाला असून जळगाव शहरातील इच्छादेवी पंचशील नगरातून ३८ वर्षीय प्रौढ घर सोडून निघून गेले आहेत. या तिघा प्रकरणात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अहपरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नशिराबाद मशिदीजवळ राहणारा संघर्ष बारकू सोनवणे (वय २०) हा तरुण सोमवारी (ता.५) सायंकाळी घरातील सदस्यांना ऑनलाइन पार्सल घेऊन येतो, असे सांगून गेला तो घरी परतला नाही. त्याचा भाऊ प्रबुद्ध सोनवणे याच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक हरेश पाटील करीत आहेत. इच्छादेवीजवळून प्रौढ बेपत्ता शहरातील इच्छादेवी मंदिरामागील पंचशील नगरात राहणारे प्रदीप वामन ढगे (वय ३८) रविवारी (ता. ४) सकाळी साडेनऊच्या सुमारास राहत्या घरातून अचानक निघून गेले. त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस नाईक इस्माईल पठाण करत आहेत. चौकट अपहरणाचा गुन्हा दाखल आसोदा (ता.जळगाव) इंदिरा नगरात वास्तव्यास असलेले बंडू रामराव पाटील (वय ४१) रविवारी (ता. ४) दुपारी काहीही न सांगता घरातून निघून गेले. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत. या प्रकरणी त्यांचे भाऊ शिवाजी पाटील यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत. ---------पुर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com