कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन असताना, नाशिकमधून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह चांदवडच्या राहुड घाटात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेतील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी कौशल्यपूर्ण तपास केला. उल्हासनगर गाठून महिलेचा गळा आवळून खून करणाऱ्यास अटक केली. या महिलेला मारण्यासाठी दहा लाखांची सुपारी घेतल्याचे तपासातून समोर तर आलेच, पण का व कोणी दिली, हे मात्र धक्कादायक...