चांदोरी- महाराष्ट्र दिनापासून गोदावरी नदीच्या पाणवेली निर्मूलन मोहिमेला चांदोरीतील विठ्ठलवाडी शिवारातून प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी स्वतः बोटीतून नदीत उतरत कामाचा आढावा घेतला आणि पाण्यात अडकलेल्या पाणवेलीच्या रचनेचा थेट अनुभव घेतला.