Nashik: शहरात NMCकडून ‘मिशन पार्किंग’! हॉटेल बाहेर रस्त्यावर उभ्या वाहनांवर चार्जेस आकारण्याचे विचाराधीन

Problem of unauthorized parking file photo
Problem of unauthorized parking file photoesakal

Nashik News : शहरात हॉटेलचे व्यवसाय दणक्यात सुरू असले तरी हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.

वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी महापालिकेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर होत असल्याने हॉटेलचालकांना आता पार्किंगची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागणार आहे.

महापालिकेच्या जागेवर वाहने उभी करायची असेल तर त्यासाठी एका वाहनामागे पाच ते दहा रुपये चार्जेस आकारले जाणार आहे. या संदर्भातला निर्णय लवकरात महापालिका प्रशासनाकडून घेतला जाणार आहे. (Mission Parking from NMC in city Under consideration of levying charges on vehicles parked on road outside hotel Nashik)

निर्णयाच्या माध्यमातून शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्याबरोबरच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा उद्देश असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिली.

शहराचा विस्तार वाढत असताना वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येत पार्किंग स्लॉटची संख्या मात्र अत्यंत कमी आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच मुख्य रस्त्यांवर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडतात.

यातून वाहनधारकांना मनस्ताप, हवा व ध्वनिप्रदूषण, वेळेचा अपव्यय, वाहतूक पोलिसांवर येणारा ताण या समस्यांना सामोरे जावे लागते.

यासाठी महापालिका आयुक्तांनी ‘मिशन पार्किंग’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात पार्किंगची व्यवस्था करण्याबरोबरच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ केली जाणार आहे.

Problem of unauthorized parking file photo
NMC News: आकृतिबंध 9 हजार पदापर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी कसरत

हॉटेलचालकांकडून चार्जेस होणार वसूल

शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय सुरू आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून रस्त्यावर वाहने लावली जातात. परिणामी वाहतूक ठप्प होते.

वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असली तरी रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने महापालिकेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा मोफत वापर करतो.

वास्तविक हॉटेलचालकांना स्वमालकीची पार्किंग बंधनकारक आहे. मात्र पार्किंगचा वापर हॉटेल व्यवसायासाठी होतो व वाहने रस्त्यावर उभी केली जातात.

त्यामुळे रस्त्यावर वाहने केल्यास त्याचे चार्जेस हॉटेलचालकांकडून वसूल करण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे महासभेच्या प्रस्तावाला मंजुरी घेऊन त्यानुसार चार्जेस आकारले जाणार आहे.

छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा विचार

महात्मा गांधी रस्ता, सीबीएस तसेच शालिमार परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. या भागामध्ये पार्किंगसाठी स्लॉट उपलब्ध नाही.

त्यामुळे जिल्हा परिषद मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची जागा ‘पे ॲन्ड पार्क’ साठी वापरता येईल का, यासंदर्भात संबंधित यंत्रणेची चर्चा केली जाणार आहे.

महात्मा गांधी रस्त्यावर स्टेडिअम कॉम्प्लेक्समधील इमारतींच्या पार्किंगचेही तपासणी करून तेथेही पार्किंगची व्यवस्था करण्याची नियोजन आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Problem of unauthorized parking file photo
NMC News: इलेक्ट्रिक बस खरेदी प्रस्तावाला ब्रेक! प्रदूषणमुक्तीसाठी अन्य प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

स्मार्ट रस्त्यावर पार्किंग

स्मार्टसिटी कंपनीकडून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका यादरम्यान स्मार्ट रस्ता तयार करण्यात आला आहे. स्मार्ट रस्त्यावर पिवळ्या कलरचे ब्लॉक टाकून सायकल ट्रॅक बनवण्यात आला आहे.

परंतु स्मार्ट रस्ता तयार झाल्यापासून एकदाही सायकल ट्रॅक म्हणून त्या जागेचा वापर झाला नाही. कायमस्वरूपी तेथे वाहने उभी राहतात. त्यामुळे ती जागा कायमस्वरूपी पार्किंगसाठी ठेवण्यासंदर्भातदेखील विचार केला जाणार आहे.

आरक्षित पार्किंगची तपासणी

शहरात समायोजित आरक्षणाखाली पार्किंग स्लॉट विकसित करण्यात आले आहे. मुंबई नाका येथे शताब्दी हॉस्पिटलच्या खाली, कॅनडा

कॉर्नर व पंचवटी विभागात पार्किंगचे स्लॉट विकसित करण्यात आले आहे. मात्र तेथे विकसित करण्यात आलेल्या पार्किंग स्लॉटचा वापर होत नसल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने तपासणी केली जाणार आहे.

"हॉटेलमध्ये वेटरला दहा ते वीस रुपये सहजपणे टीप दिली जाते. मात्र लाखो रुपये किमतीचे वाहने महापालिकेच्या रस्त्यावर उभी केली जातात. तेथे कुठलेही चार्जेस आकारले जात नाही. उलट वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार होतात. त्यामुळे पार्किंग असूनही हॉटेल बाहेर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर चार्जेस आकारण्याचे विचाराधीन आहे."

- डॉ अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

Problem of unauthorized parking file photo
NMC News: औद्योगिक करवाढीचा मुद्दा महापालिकेकडे! राज्य शासन नगर विकास विभागाचे पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com