

लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्क्रिनिंग होणार असून त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होतील व गर्दीत होणारे संक्रमण थांबेल. तसेच उर्वरित नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला बळकटी मिळणार आहे. (Mission Zero, Mission Vaccination Campaign succeeds in the fight against Corona)
नाशिक : कोरोना विरुद्धच्या लढाईत (Fight with corona) यशस्वी होत असलेल्या मिशन झिरो (Mission Zero) व मिशन लसीकरण (Mission Vaccination) मोहिमेने गेल्या १५ दिवसात ११००० चा टप्पा ओलांडला असून त्यात १११८२ नागरिकांच्या अँटीजेन चाचण्या (Antigen Test) करण्यात आल्या तर ११७६३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.
स्वयंसेवकांची विशेष मेहनत
पंचवटी विभागातील इंदिरा गांधी रुग्णालय, मायको दवाखाना फुले नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र म्ह्सरूळ, मखमलाबाद, मार्केट यार्ड दिंडोरी रोड, हिरावाडी, रेडक्रॉस, तपोवन, नांदूर नाशिक रोड विभागातील खोले मळा, सिन्नर फाटा, दसक पंचक व नाशिक पश्चिम विभागातील जिजामाता-मेन रोड, रामवाडी-गंगापूर रोड येथे हे अभियान सुरु असून आज १५ व्या दिवशी एकूण १६४९ अँटीजेन चाचण्या होऊन १२ पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात आले. या प्रमाणे मिशन सुरु झाल्या पासून १५ दिवसात १११८२ अँटीजेन चाचण्या होऊन १३७ पॉझिटिव्ह रुग्णांना शोधण्यात यश आले तर ११७६३ च्या वर निगेटिव्ह रुग्णांचे अत्यंत शिस्तीने व लसीकरणा साठी आलेल्या वयस्कर व्यक्तींना विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन लसीकरण पूर्ण करण्यात आले याकामी फिल्ड वर कार्यरत स्वयंसेवक विशेष मेहनत घेत आहेत.
नागरिकांची लसीकरणापूर्वी अँटीजेन किंवा आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणी होऊन त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून त्यांना आवश्यक सल्ला व उपचार उपलब्ध करून देणे व निगेटिव्ह व्यक्तींचेच लसीकरण व्हावे या संकल्पने द्वारे एकत्रितपणे मिशन झिरो व मिशन लसीकरण हे अभियान नाशिक महानगर पालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स या संस्थांद्वारे पंचवटी, नाशिक रोड, नाशिक पश्चिम विभागात सुरु करण्यात आले आहे.
संक्रमणाला बसेल आळा
दिंडोरी रोड वरील भाजीपाला मार्केट यार्डाच्या प्रवेश द्वारावर संशयित व्यक्तींना अँटीजेन चाचणी करणारी टीम कार्यरत असून गेल्या ४ दिवसात ४४६ चाचण्या होऊन ४३९ इतक्या व्यक्तींना निगेटिव्ह प्रमाणपत्र देण्यात आले. त्या योगे त्यांना त्यांचा मार्केटयार्डातील पुढील व्यवहार करणे सोयीचे होईल.
या योगे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्क्रिनिंग होणार असून त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होतील व गर्दीत होणारे संक्रमण थांबेल. तसेच उर्वरित नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला बळकटी मिळणार आहे.
लवकरच लसींचा पुरवठा सुरळीत झाल्यावर नाशिकच्या सहा ही विभागातील सर्व ३० लसीकरण केंद्रां वर महानगर पालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी, नाशिक वॉरियर्स या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मिशन झिरो हे अभियान सुरु होणार आहे. या ठिकाणी लसीकरणा व्यतिरिक्त ही नागरिक येऊन अँटीजेन चाचणी करून घेऊ शकतात व त्या योगे मनातील भीती दूर होण्यास मदतच होईल व आवश्यकता असल्यास सल्ला व उपचार घेऊ शकतात त्या मुळे पुढील संक्रमण रोखण्यास हातभार लागेल.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी महापौर सतीश नाना कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव, उपमहापौर भिकुभाई बागुल, स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते यांचे सह मनपा चे पदाधिकारी, नगरसेवक, आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ राजेंद्र त्र्यंबके, डॉ आवेश पलोड, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंके, कोरोना नोडल अधिकारी डॉ विजय देवकर, डाॅ जितेंद्र धनेश्वर, डॉ चारुदत्त जगताप, डॉ. कल्याणी होळकर, आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरीने मिशन झिरो व मिशन लसीकरण मोहिमेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, ललित सुराणा, अभय ब्रम्हेचा, अमित बोरा, गोटू चोरडिया, गौतम हिरन, रवींद्र चोपडा, रोशन टाटीया, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, नाशिक वॉरियर्सचे नरेंद्र गोलिया, गोपाल अटल, रामेश्वर मालानी, राजा जॉली, विनोद गणेरीवाल, ओम रुंगठा, स्वामी समर्थ मंदिर रविवार पेठ चे अॅड राजेंद्र लोढा हे परिश्रम घेत आहेतड राजेंद्र लोढा हे परिश्रम घेत आहेत.
(Mission Zero, Mission Vaccination Campaign succeeds in the fight against Corona)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.