नाशिक- जिल्हा परिषद, नाशिकने डिजिटल युगाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत ‘अनुकंपा भरती संगणकीय प्रणाली’ या नवीन पोर्टलची निर्मिती केली आहे. त्याचे अनावरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ८) करण्यात आले.