सर्पदंशाने मृत्यू झालेल्या ज्ञानेश्वर क्षीरसागर कुटुंबीयांचे आमदार गावितांकडून सांत्वन

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या ज्ञानेश्वर क्षीरसागर कुटुंबीयांचे आमदार गावितांकडून सांत्वन
Published on: 
WRS26B02840 घोडदे (ता. साक्री) : ज्ञानेश्वर क्षीरसागर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना आमदार मंजुळा गावित. --------------- दिवसा आठ तास सुरळीत वीजपुरवठा करा आमदार गावित : सर्पदंशाने मृत्यू झालेल्या ज्ञानेश्‍वरच्या कुटुंबीयांचे सांत्वन सकाळ वृत्तसेवा वार्सा, ता. ६ : घोडदे (ता. साक्री) येथील गरीब शेतकरी कुटुंबातील युवक ज्ञानेश्‍वर सुरेश क्षीरसागर यांचा शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी क्षीरसागर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दिवसा आठ तास सुरळीत वीजपुरवठा करण्यासोबतच स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ कुटुंबाला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी आमदार गावित यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली. उपस्थित शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी कृषीपंपांसाठी होणारा विजेचा लपंडाव तसेच सर्पदंशाच्या वाढत्या घटनांबाबत आमदार गावित यांच्याकडे चिंता व्यक्त केली. रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाणे शेतकऱ्यांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या समस्येची तातडीने दखल घेत आमदार गावित यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांना दिवसा आठ तास अखंडित वीजपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात जावे लागू नये आणि सर्पदंशासारख्या दुर्घटना टाळता याव्यात, यासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com