नाशिक- मखमलाबाद शिवारातील सुमारे ७५३ एकर जागेवर स्मार्टसिटी कंपनीमार्फत हरित क्षेत्र विकासांतर्गत नगररचना योजना करण्याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली.