आमदार हिरामण खोसकरांना कोरोनाचा विसर; किर्तनात झाले दंग | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mla hiraman khoskar forgot the corona restrictions and participated in the kirtan

आमदार हिरामण खोसकरांना कोरोनाचा विसर; किर्तनात झाले दंग

नाशिक : सध्या देशात आणि राज्यात कोरोनाने थैमान घातले असून मागील काही दिवसांपासून कोरोना (Corona) पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रणाणात वाढत आहे. इतकेच नाही तर लोकप्रतिनीधींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. राज्यातील अनेक नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र काही प्रतिनिधीनी यापासून कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही.

आज आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी अगदी देह-भान, वेळ विसरून हरीनामाचा जप करीत टाळ मृदुंगाच्या आवाजात मग्न होऊन किर्तन श्रवनात सहभाग घेतला मात्र यासोबत त्यांना कोरोना निर्बंधांचा देखील विसर पडल्याचे दिसून आले.

खोसकर हे मतदारसंघातील कामे, मिटिंग्ज, उद्घाटन समारंभ, लग्न, दहावे, वर्षश्राद्ध ईतर कार्य समारंभ या साठी निरंतर सततची धावपळ करीत असतात. आमदार हिरामण खोसकर यांनी आज ह. भ.प.माधव महाराज घुले यांचे अभीष्ठचिंतन सोहळ्यानिमीत्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताह, घोटी येथे गुरूवर्य ह.भ.प. माधवमहाराज घुले यांचे चरणावर नतमस्तक होऊन किर्तनात भाग घेतला कार्यक्रमांत आणि किर्तनात इतके दंग झाले की त्यांना राज्यात कोरोना निर्बंध आहेत याचा देखील विसर पडल्याचे दिसून आले.

हेही वाचा: नाशिक : सुसाइड नाेट लिहीत नवविवाहितेची आत्महत्या

नुकतेच भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची मुलगी अंकिता पाटील (Ankita Patil) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे लग्न मंगळवारी पार पडले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.

हेही वाचा: Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusNashik
loading image
go to top