Nashik : आमदाराने स्वतःला कोंडून घेत केलेली पूजा निष्फळ

Eknath Shinde & Devendra Fadanvis
Eknath Shinde & Devendra Fadanvisesakal

नाशिक : मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गळ्यात टाकून सत्तेच्या जुगारात हुकमी पत्ता देवेंद्र फडणवीस यांनी टाकल्याने जिल्ह्यातील एका आमदाराने एक दिवस घरात स्वतःला कोंडून घेत केलेली पूजा निष्फळ ठरणार असली तरी, पूजा मात्र भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. (MLA self imposed pooja to get Minister of State Nashik Political News)

राज्याच्या राजकारणात विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ट्विस्ट निर्माण झाला तो महाविकास आघाडीतील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे. शिंदे यांच्या बंडात एक-एक करत शिवसेनेचे ४० आमदार सहभागी झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार गडगडणार, यावर शिक्कामोर्तब झाले. बंडखोरी उघड नसली तरी पडद्यामागून भाजपकडून सूत्रे हलवली जात असल्याचे स्पष्ट होत होते. तसे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येऊन मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस बसतील, हे जवळपास निश्चित होते. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने विश्वासदर्शक ठराव संमत करण्यास सांगावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केल्यानंतर भाजप सत्तेत येणार यावर शिक्कामोर्तब झाले.

त्यामुळे मंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी ऐनकेन प्रकारे शहरातील एका आमदाराने प्रयत्न केले. मुंबई-दिल्लीपासून फिल्डिंग लावताना थेट देवाला साकडे घातले. त्यासाठी स्वतःला बंगल्यात कोंडून घेत मोठी पूजा केली. कुठल्या प्रकारची पूजा केली हे बाहेर आले नसले तरी होमहवन झाल्याची बातमी माजी जिल्हाध्यक्षाच्या कानावर आली. कामानिमित्त गेलेल्या जिल्हाध्यक्षाला भेट न दिल्याने हा प्रकार बाहेर आला.

Eknath Shinde & Devendra Fadanvis
Nashik : तारांगण 7 जुलैपासून होणार खुले

शेवटच्या क्षणी भ्रमनिरास

दिवसभराच्या पूजेनंतर किमान राज्यमंत्रिपद मिळावे, असे साकडे देवाला घातले. परंतु ३० जूनला शपथविधी अगोदरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे जाहीर झाल्यानंतर मंत्रिपदासाठी इच्छुक आमदाराचा भ्रमनिरास झाला.

Eknath Shinde & Devendra Fadanvis
Nashik : स्वाईन फ्लू रुग्ण आढळल्याने मनपा सतर्क

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com