सिटी गॅस वितरण नेटवर्कच्या सवलतींना मार्च पर्यंत मुदतवाढ

सिटी गॅस वितरण नेटवर्कच्या सवलतींना मार्च पर्यंत मुदतवाढ
Published on: 
टूडे साठी ----------- ‘एमएनजीएल’ ला दिलासा; राज्य शासनाकडून मुदतवाढ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : राज्यातील सिटी गॅस वितरण नेटवर्कचा विस्तार वेगाने होण्यासाठी राज्य शासनाने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींना मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. नगरविकास विभागाने याबाबतचा आदेश काढला असून, यामुळे नाशिकमध्ये गॅस पाइपलाइन टाकणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी २७ मार्च २०२६ च्या शासन आदेशान्वये राज्यातील कंपन्यांना ३० जून २०२६ पर्यंत सवलती लागू करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारचे निर्देश आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सूचनेचा विचार करून नगरविकास विभागाने २७ मार्च २०२६ च्या आदेशातील सर्व सवलतींना आता ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवण्यास अंतिम मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील गॅस पाईपलाईनच्या पायाभूत सुविधा उभारणीला गती मिळणार असून आहे. महापालिका हद्दीत भूमिगत गॅस पाईपलाईनसाठी एकूण ७४० किमीची मंजुरी असून, त्यापैकी ६४० किमीचे काम एमएनजीएल कंपनीने पूर्ण केले आहे. अद्याप १०३ किमी रस्त्यांचे खोदकाम बाकी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. रस्ते पूर्ववत करण्यापूर्वीच उर्वरित पाइपलाइनचे काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिकेने दिल्याने पुन्हा खोदकाम होणार असल्याचे चित्र आहे. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.