नाशिक- शहरात गेल्या काही दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा निर्माण झालेला असल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने २६ एप्रिलपासून सीएनजी विक्री बंदचा इशारा दिला होता. त्याची दखल घेताना एमएनजीएल कंपनीने असोसिएशनच्या शिष्टमंडळाला सोमवारी (ता. २१) चर्चेसाठी बोलविले आहे. त्यामुळे या बैठकीकडे वाहनचालकांचेदेखील लक्ष लागून राहणार आहे.