Nashik : संमेलन स्थळाला सावरकरांचे नाव देण्याची मनसेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savarkar
संमेलन स्थळाला सावरकरांचे नाव

संमेलन स्थळाला सावरकरांचे नाव देण्याची मनसेची मागणी

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळ, प्रवेशद्वार किंवा व्यासपिठाला स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत स्वागताध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, संमेलन स्थळाला कुसुमाग्रज नगरी नाव देण्यात आले आहे. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नामोल्लेख टाळल्याची भावना नाशिककरांची आहे.

आयोजकांना सुरवातीला साहित्य संमेलनाच्या स्वागत गीतात स्वा. सावरकरांच्या नावाचा विसर पडला होता. मात्र, मनसे व जागरूक नाशिककरांच्या आक्षेपामुळे स्वागत गीतात सुधारणा करण्यात आली. स्वागताध्यक्ष या नात्याने आपण संमेलन स्थळ, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठास स्वातंत्र्यवीर वि, दा. सावरकर असे नांव दिल्यास ती सावरकरांना श्रद्धांजली ठरेल. ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, अॅड. अभिजित बगदे यांनी हे निवेदन दिले.

loading image
go to top