
राज ठाकरे हेच खरे हिंदुत्वाचे वारसदार; मनसे नेते बाळा नांदगावकर
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हेच खरे हिंदुत्वाचे वारसदार आहे. मनसेच्या हिंदुत्वात मुस्लिमदेखील सहभागी आहेत. हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केल्यानंतर अनेकांना भीती वाटली, असा दावा मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी केला. मनसेच्या नाशिक येथील राजगड कार्यालयाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन परशुराम साईखेडकर नाट्यगृहात करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. (MNS leader Bala Nandgaonkar statement about raj thackeray on MNS hindutva Nashik Political news)
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, की राज्यात जे नाट्यंतर घडले ते घडत असताना शिवसेनेचे आमदार फुटत होते. त्यातून आनंद नव्हता, तर वेदना होत होत्या. त्याला कारण म्हणजे शिवसेना आम्ही उभी केली. अशा पद्धतीने शिवसेना फुटत असताना दुःख होत होते. मनसेची स्थापना झाली त्या वेळेस इतर पक्ष फोडायचे नाही, ही आमची भूमिका होती. हे तत्त्व आम्ही आजही पाळले. कोणाचा पक्ष फोडला नाही. नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोमणा मारला. आनंद दिघे यांच्या निधनानंतर रघुनाथ मोरे ठाण्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष झाले; परंतु दुर्दैवाने काही दिवसातच त्यांचा अपघात झाला. त्या वेळी मी शिवसेनेचा संपर्क नेता होतो. राजन विचारे, रवींद्र फाटक, नरेश म्हस्के व एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाला जिल्हाध्यक्ष करायचे, असा निर्णय घ्यायचा होता. एकनाथ शिंदे यांना एक कार्यकर्ता घेऊन आला.
हेही वाचा: सीपेट प्रकल्पाला भुजबळांकडून खोडा; खासदार हेमंत गोडसे यांचा आरोप
त्यांनी शिंदे यांना जिल्हाध्यक्ष व्हायचे आहे, असे सांगितले. शिंदे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद त्या वेळी मी सोपवले होते. त्या वेळी शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी केलेली निवड चुकली नाही, हे आज मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा दावा नांदगावकर यांनी केला. मनसेचे प्रदेश प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, एकदा यश मिळाल्यानंतर कार्यकर्ते स्वस्थ होतात. कायम प्रयत्न केल्यास यश टिकून राहाते. नाशिकच्या यशाबाबत हेच झाले. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन पत्र वाटपाचे आवाहन केले होते, मात्र नाशिकमधून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली. प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, माझे नगरसेवक सलीम शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. समन्वयक सचिन भोसले, ॲड. रतनकुमार इचम, श्याम गोहाड, पराग शिंत्रे, विक्रम कदम, सुजाता डेरे, मनोज घोडके, नंदिनी बोडके, प्रमोद साखरे, नितीन साळवे, अर्चना जाधव, कामिनी दोंदे, सत्यम खंडाळे, अक्षय खांडरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा: Nashik : आयुक्तालयातील 90 जमादार झाले फौजदार
Web Title: Mns Leader Bala Nandgaonkar Statement About Raj Thackeray On Mns Hindutva Nashik Political News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..