Maharashtra Navnirman Sena
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीतील दारुण पराभव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिव्हारी लागला आहे. पराभवाच्या कारणांचा शोध घेताना निवडणुकीतील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा घेतला जाणार आहे. त्या संदर्भातील अहवाल पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सादर करताना पक्षांतर्गत लवकरच संघटनात्मक बदलाचे संकेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, ठाकरे हे लवकरच सर्व उमेदवारांची भेट घेणार आहेत.