मनसेत पदोन्नती की पदावनती? शाखाध्यक्ष मेळाव्यातील यादीवरून चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray

मनसेत पदोन्नती की पदावनती? शाखाध्यक्ष मेळाव्यातील यादी

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेकडून (MNS) संघटनात्मक बळकटीवर भर दिला जात असून, मुंबईच्या धर्तीवर शाखाध्यक्ष केंद्रीभूत मानून १२२ प्रभागांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मंगळवारी (ता.२१) प्रारंभाच्या दौऱ्यात यादी निश्‍चिती केली आहे. आज (ता.२३) नाशिकमध्ये येणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात यादी जाहीर करून जबाबदारी सोपविली जाणार आहे. पण ही यादी जाहीर होताच मनसेत पदोन्नती की पदावनती? चर्चेला उधाण आले आहे

मनसेत पदोन्नती की पदावनती?

शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष असलेले दिलीप दातीर यांना शहराध्यक्ष पद देण्यात आले आहे. तर शहराध्यक्ष अंकुश पवार यांना जिल्हाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष रतन कुमार इचम यांना जिल्हाध्यक्ष, सलीम शेख प्रदेश यांना उपाध्यक्ष तर अनंत सूर्यवंशी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. यावरून मनसे पक्षात पदोन्नती की पदावनती? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

हेही वाचा: नाशिक : राज ठाकरेंच्या 'बालेकिल्ल्यातच' प्रवास खडतर !

मनसेत संवादाचे दर्शन

गेल्या काही दिवसांपासून मनसेत अंतर्गत वाद सुरू असून, वरिष्ठ नेत्यांकडून नव्या नेतृत्वाला संधी दिली जात नसल्याची तक्रार आहे. सत्ताधारी भाजप विरोधात आंदोलनासाठी मोठी संधी असताना आंदोलन करू दिले जात नाही. मुंबईतील नेत्यांशी थेट संवाद साधल्यास स्थानिक वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागते अशी तक्रार आहे. त्यातून मनसेत विसंवाद निर्माण झाला असून, राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त एकोपा दिसत असला तरी हा वरवरचा संवाद असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: राज ठाकरे कार्यकर्त्यांना समज द्या! - नाशिक पोलीस आयुक्त

loading image
go to top