नाशिक- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे-शिवसेना (उबाठा) एकत्र येतील किंवा नाही, याबाबत राज आणि उद्धव ठाकरे यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. असे असताना मनसेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विशेष करून शहरी भागावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे व नवी मुंबई या शहरांकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. सर्वाधिक नागरीकरण होत असलेल्या या शहरांमध्ये ताकद आजमावून जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाण्याची शक्यता आहे.