धुळे टुडे ३ संक्षीप्त

धुळे टुडे ३ संक्षीप्त
Published on: 
धुळे ः टुडे ३ साठी, संक्षिप्त --- मोबाईल हॅक करून १.४५ लाखांचा गंडा धुळे : मोबाईलवर संदेश पाठवून शेतकऱ्याच्या बँक खात्यातून एक लाख ४५ हजार ३४८ रुपये ऑनलाइन काढून फसवणूक केल्याची घटना हेंकळवाडी (ता. धुळे) येथे घडली. भगवान सुदाम पाटील यांच्या फिर्यादीनुसार सोनगीर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. भगवान पाटील यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने संदेश पाठविला. नंतर १४ सप्टेंबरला रात्री नऊच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून ९६ हजार ५४८ रुपये, तर १६ सप्टेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास फिनो पेमेंट बँकेच्या खात्यातून ४८ हजार ८०० रुपये काढण्यात आले. खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी भाऊ समाधान यांना माहिती दिली. यानंतर सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदविण्यात आली. - गोवंशांची सुटका; तिघांविरुद्ध गुन्हा धुळे : मोघण-तिखी (ता. ६) रस्त्यावर वाहनातून विनापरवाना दाटीवाटीने वाहतूक करण्यात येणाऱ्या पाच गोवंशांची मोहाडी पोलिसांनी सुटका केली. मंगळवारी (ता. ६) केलेल्या कारवाईत दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सोपान दशरथ भिल (रा. धाडरे, ता. धुळे) याच्यासह मुजम्मिल इस्माईल मण्यार व मुन्ना इस्माईल मण्यार (दोघे रा. मोघण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. भिल हा कारवाईदरम्यान पसार झाला.
Marathi News Esakal
www.esakal.com