नाशिक- वेळ सायंकाळी साडेचारची. शहरातील केटीएचएम महाविद्यालयात विद्यार्थी घरी जाण्याच्या आनंदात असतानाच एका पाठोपाठ तीन हवाई हल्ले घडतात अन् क्षणार्धात घटनास्थळी एकच धावपळ उडते. भारतीय वायुसेनेकडून जिल्ह्याच्या नागरी संरक्षण दलाला या हल्ल्याचा संदेश प्राप्त होतो. त्यानुसार नागरी संरक्षण दलाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला हल्ल्याची माहिती कळते. जिल्हा प्रशासन भोंगा वाजवून जनतेला धोक्याचा इशारा देते. दुसरीकडे आपत्कालीन सर्व यंत्रणांना संदेश प्राप्त झाल्यानंतर पाच मिनिटांत घटनास्थळी पोचून मदतकार्य सुरू करतात.