कोर्डीद येथे शेतकरी मार्गदर्शन

कोर्डीद येथे शेतकरी मार्गदर्शन
Published on: 
धुळे : टुडे पान ३ किंवा ४ साठी... -- कोर्डीद येथे खेत बचाव अभियानांतर्गत मार्गदर्शन -- तंत्रज्ञान, हवामान अनुकूल शेती, पशुसंवर्धनाचे धडे -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ : जनजातीय गौरव दिन सप्ताहांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्रातर्फे कोर्डीद (ता. शिरपूर) येथे ‘खेत बचाव अभियान’ अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करण्यात आले. - कृषी विज्ञान केंद्र, धुळेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील, पशुसंवर्धन शास्त्रज्ञ डॉ. धनराज चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाची परिस्थिती लक्षात घेता दुष्काळी व कमी पावसाच्या काळात कमी कालावधीच्या पिकांची निवड करावी, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन साधत संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले. तसेच आधुनिक भाजीपाला लागवड, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आणि पीक संरक्षणावर आदींवर मार्गदर्शन करण्यात आले. शेतीसोबतच जनावरांचे आरोग्य, संतुलित आहार आणि नियमित लसीकरणाचे महत्त्व सांगून शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनातून पूरक उत्पन्न वाढवावे, असा सल्ला यावेळी देण्यात आला. सुरपसिंग पावरा यांनी सूत्रसंचालन केले. पोलिसपाटील भरत पावरा, पंचायत समितीचे माजी सदस्य कांतीलाल पावरा, विनोद पावरा, राड्या पावरा आदींनी सहकार्य केले.