पिंपळगाव बसवंत: जिवंतपणे जन्मदात्या बापाला मरणयातना देणाऱ्या काही निष्ठुर मुलांबाबत समाजात अनेक कटू कहाण्या ऐकायला मिळतात. पण, आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजणारे वडील जिवंत राहावेत म्हणून स्वतःच्या जिवाची पर्वा न करता यकृताचा भाग दान करणारा मुलगा हा खरा आधुनिक श्रावणबाळ ठरला आहे. ओझर येथील सिंग पिता-पुत्राची कहाणी काळजाला भिडणारी अन आई-वडिलांना वार्धक्यात दूर सारणाऱ्यांसाठी डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे.