Nashik News : भारती, तुला काय व्हायचे आहे? PM मोदी यांचा कावनईच्या भारती रणला सवाल

निमित्त होते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान अर्थात पी. एम. जनमन अंतर्गत योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साधलेल्या संवादाचे.
PM Narendra Modi
PM Narendra Modiesakal

नाशिक : ‘तुला मोठं होऊन काय व्हायचे आहे?’ असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कावनई येथील रहिवासी व पिंप्री सदो येथील एकलव्य विद्यालयाच्या नववीतील विद्यार्थिनी भारती रण हिला विचारला.

त्यावर भारतीने आयएएस व्हायचे आहे, असे उत्तर दिले असता यासाठी तू कोणाची प्रेरणा घेतली, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी केला.

त्यावर माझा भाऊ शिक्षक असून तोच प्रेरणास्थान असल्याचे तिने सांगितले. यासाठी निमित्त होते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान अर्थात पी. एम. जनमन अंतर्गत योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साधलेल्या संवादाचे. (Modi asked question to kavnai girl Bharti ran In P M Beneficiaries of schemes under Janman Nashik News)

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (ता.१५) कावनई (ता. इगतपुरी) येथील भारती रण व तिचे शिक्षक भाऊसाहेब रण यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली.

यावेळी केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण तथा जनजातीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, आदिवासी विकास विभाग आयुक्त नयना गुंडे, आदिवासी सहकारी विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, नाशिक प्रकल्प अधिकारी जतिन रहमान, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, गट विकास अधिकारी सोनी नाखाडे यांच्यासह कावनईचे ग्रामस्थ उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एकलव्य विद्यालयांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.

कातकरी समाजातील लाभार्थी गोकुळ देवराम हिलम यांनी मनोगतात प्रधानमंत्री आवास योजनेसह अंत्योदय रेशन कार्ड, वनधन योजनेंतर्गत वनधन केंद्राला मान्यता मिळाल्याचे शासनाचे आभार मानले.

PM Narendra Modi
YCMOU News : मुक्त विद्यापीठ कुलसचिवपदी दिलीप भरड! प्रदीर्घ काळापासून प्रभारींवर होती जबाबदारी

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोबाईल युनिट व्हॅनला हिरवा झेंडा दाखविला. तसेच मान्यवरांनी कपिलधारा मंदिर परिसराची स्वच्छताही केली.

आदिवासी विकासासाठी सहकार्य : डॉ. गावित

पी. एम. जनमन महा अभियानाच्या माध्यमातून कमी वेळेत आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ मिळत आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल.

तसेच आवास योजनेचा निधी वाढवून देण्यासाठीही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. घरकुल योजना १०० टक्के राबविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

कातकरी बांधवांचे स्थलांतर थांबावे, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

PM Narendra Modi
Nashik News: दिंडोरी प्रणीत समर्थ सेवा मार्गाचा 24 पासून जागतिक कृषी महोत्सव : आबासाहेब मोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com