Mohammed Rafi Birthday: त्यांच्याकडे आहे रफींच्या 20 हजार गाण्यांचा खजिना! अर्धा पगार कॅसेट अन् रेकॉर्डरसाठी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Dusane

Mohammed Rafi Birthday: त्यांच्याकडे आहे रफींच्या 20 हजार गाण्यांचा खजिना! अर्धा पगार कॅसेट अन् रेकॉर्डरसाठी!

नाशिक : ‘चाहूंगा तुझे सांज सवेरे...बहारो फूल बरसाओ....जब कभी भी सुनोगे गीत मेरे....’, अशा गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महम्मद रफींचा शनिवारी (ता. २४) जन्मदिन. आवाजाचे बादशाह रफी यांच्या आवाजाचे वेड लागलेल्या चंद्रकांत दुसाने यांनी रफींच्या २० हजार गाण्यांचा संग्रह केला आहे. कंपनीत नोकरी करताना अर्धा पगार ते कॅसेट आणि रेकॉर्डरसाठी खर्च करत. एवढेच नव्हे, तर बुलेट विकून त्यांनी प्लेअर विकत घेतला. (Mohammed Rafi Birthday chandrakant dusane treasure of 20 thousand songs of Rafi nashik news)

भारत-चीनच्या १९६२ च्या युद्धावेळी भारतीय जवानांसाठी ‘अब तो तुम्हारे हवाले वतन साथीओ, आवाज दो हम एक हैं’, हे गाणे रफींनी गायले. त्यांनी मराठी गाणी गायली आहेत. ‘शोभिसी मालवा’, ‘प्रभू तू दयाळू’, ‘हसा मुलांनो हसा’, अशी अनेक गाणी त्यांनी गायली. त्यांच्या गाण्यांनी पक्षीमित्र म्हणून परिचित असलेल्या दुसाने यांच्या मनावर गारुड केले.

त्यातूनच श्री. दुसाने यांनी ३० वर्षांपासून रफींच्या गाण्यांचा संग्रह करण्यास सुरवात केली. गावात चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी टांगा फिरत असे. टांगेवाल्याकडे चित्रपटाची छोटी पुस्तिका असायची. त्यामध्ये त्या चित्रपटाची गाणी आणि अल्प कथा असायची. पुस्तिका ३ ते ६ पैशात मिळत असे. श्री. दुसाने यांच्याकडे अशा जुन्या चित्रपटांच्या ५०० पुस्तिका आहेत. लहानपणी दुसाने काही ऐकत नसतील, तर त्यांची आई त्यांना महम्मद रफीची शपथ देत आणि दुसाने लगेच काम करत.

श्री. दुसाने यांनी नवीन सदनिका विकत घेतली. त्या वेळी त्यांनी रफींच्या गाण्यांचा कार्यक्रम केला होता. त्यांच्याकडे ‘मेड इन जर्मनी’ चे रेकॉर्ड प्लेअर, गेलार्ड कंपनीचे ‘मेड इन इंग्लंड’ची सिस्टीम, स्कूल टेप रेकॉर्ड, मायक्रो कॅसेट, मिनी डिस्क, फिल्म कार्ड रेडिओ, आय पोड, ग्रामोफोन, थ्री इन वन, फायू सीडी चेंजर, वॉटर प्रूफ टेप रेकॉर्ड, ५१ सीडी चेंजर, आणि त्याच्या ‘सेप्रेशन’ साठीचे ग्राफिक एक्युलायझर, ईको चेंबर, पॉवर अम्प, प्री- इम्प्लिफयर युनिट श्री. दुसाने यांच्याकडे आहेत.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : ‘साहेब, लाईट कधी येईल होऽऽ’; अंबासनच्या त्रस्त कांदा उत्पादकांची आर्त हाक

दुसानेंचा संग्रह

* पाच हजार रेकॉर्ड, अडीच हजार कॅसेट, दोन हजार सीडी, दोन हजार डीव्हीडी

* आडव्या बॉक्समधील चेंजरमध्ये ग्रामोफोन व रेडिओ असून त्यात बारा रेकॉर्ड बसतात

* १९८० त्या दशकात सुरु झालेला महम्मद रफी क्लबमध्ये सहभाग

* निवृत्तीच्या वयात प्रोजेक्टर घेतला असून रफींची गाणी, चित्रपट पाहण्यात दवडतात वेळ

"जळगाव येथे १९७८ मध्ये महम्मद रफींच्या गाण्यांचा ‘लाइव्ह' कार्यक्रम होता. तेथे त्यांना प्रथम पाहण्याची संधी मिळाली. मुंबईतील बांद्रामधील मशिदीमध्ये आल्यावर त्यांना पाहत असू. रफींच्या संग्रहामुळे मला मोठी श्रीमंती मिळाली आहे. माझा संग्रह वाढवण्यासाठी पत्नी अनुराधा हिची मदत झाली." - चंद्रकांत दुसाने, संग्राहक

हेही वाचा: Nashik News : ‘मांडवा’च्या परंपरेस ग्रंथतुलेची जोड! वऱ्हाडी मंडळीस औषधी वृक्षरोपांची भेट

टॅग्स :NashikartmusicMusic album