
विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू; कापशी गावातील घटना
देवळा (जि. नाशिक) : कापशी (ता. देवळा) येथे रविवारी (ता. १७) रोहित्रावरील विजेचा धक्का (Electric Shock) लागून माकडाचा मृत्यू (monkeys death) झाला.
वनविभाग (Forest Department) व महावितरणच्या (MSEDCL) कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत माकडास खाली उतरवले. परंतु, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. (Monkey dies from electric shock Incident in Kapshi village nashik Latest Marathi News)
हेही वाचा: Nashik : साक्री- शिर्डी महामार्गावर ट्रॅक्टर उलटला
कापशी गावात माकड, मोर व रानडुकरांची संख्या मोठी आहे. हे प्राणी गाव व शिवारात वावरत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात. रविवारी कापशी येथील शेतकरी तुकाराम आनंदा भदाणे यांच्या शेताजवळील रोहित्र क्रमांक पाचवर एक माकड चढून गेल्याने त्यास विजेचा धक्का लागला.
त्यातच त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकार होऊ नये, यासाठी कापशी ग्रामस्थांकडून वनविभागाकडे प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. घटनास्थळी वनविभाग व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुढील कार्यवाही केली.
या वेळी योगेश भदाणे, महेश भदाणे, नितीन भदाणे, भूषण भदाणे, ओम भदाणे, गणेश भदाणे, उत्तम भदाणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. वनविभागाने यात लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाय करावेत, प्राण्यांचे जीव वाचावेत व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे कापशीचे अध्यक्ष जयदीप भदाणे, उपाध्यक्ष विजय भदाणे, आबा भदाणे, वाळू माळी, महेश भदाणे व ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा: सोयगावी मुख्य रस्त्यांचीच दुरवस्था; अच्छे दिन येणार कधी?
Web Title: Monkey Dies From Electric Shock Incident In Kapshi Village Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..