नाशिकमध्ये वरुणराजाची जोरदार हजेरी | monsoon update Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

नाशिकमध्ये वरुणराजाची जोरदार हजेरी

नाशिक : मॉन्सूनचे वेळापत्रक बिघडल्याने मागील महिन्यात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वरमध्ये महिन्याच्या सरासरी पावसाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. आज (ता.१) सकाळी संपलेल्या चोवीस तासात इगतपुरी तालुक्यात १३.३, तर त्र्यंबकेश्‍वरमध्ये ८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच आज नाशिक शहर आणि परिसरात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरवासीयांनी पडत्या पावसात कामे करावी लागली.

हेही वाचा: पुढील 2-3 दिवसांत संपूर्ण भारतात मान्सूनचा होणार वर्षाव; हवामान खात्याचा इशारा

कळवण, सिन्नर, चांदवड तालुक्यात मात्र २४ तासात पावसाची नोंद झाली नाही. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : मालेगाव-०.८, बागलाण-५.४, नांदगाव-०.७, सुरगाणा आणि नाशिक- प्रत्येकी ०.६, दिंडोरी-०.४, पेठ-१.२, निफाड-१.९, येवला-०.३, देवळा-२.१. सध्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्यांना सुरवात केली आहे. पण तरीही विशेषतः भाताची रोपे टाकण्यासाठी आदिवासी भागात आणखी पावसाची आवश्‍यकता आहे.

आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ५.६, नाशिक जिल्ह्यात ३.३, धुळ्यात २, नंदुरबारमध्ये ४.१, जळगावमध्ये ०.९ मिलिमीटर पाऊस झाला. कोकण विभागात ६२, नाशिक विभागात १.९, पुणे विभागात ७, औरंगाबाद विभागात ७.२, अमरावती विभागात ११.८, नागपूर विभागात १२.१ मिलिमीटर पावसाची २४ तासात नोंद झाली आहे.

धरणांमध्ये २३ टक्के जलसाठा

धरण समूह जलसाठा टक्के

गंगापूर २२

पालखेड १२

ओझरखेड २०

दारणा २१

गिरणा खोरे ३१

पूनंद १७

हेही वाचा: इगतपुरी परिसरात पावसासह धुक्याने नागरिक आनंदात

Web Title: Monsoon Rain Update In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top