Monsoon Tourism: रिमझिम सरीत बहरली वर्षासहल! वीकएंडमुळे तोबा गर्दी

Tourists
Touristsesakal

Monsoon Tourism : वीकएंडला पावसाळी पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबकेश्‍वर रोडवरील पहिने या घाटमाथ्यावर पर्यटकांनी वर्षासहलीसाठी रविवारी (ता. २३) तोबा गर्दी केली होती.

तब्बल दीड- दोन महिन्यांच्या उसंतीनंतर पावसाने घाटमाथ्यावर काहीसा जोर धरल्याने ब्रह्मगिरीच्या डोंगर रांगेतील धबधबे कोसळू लागले आहेत.

चोहीकडे हिरवळ अन् रिमझिम पावसाच्या सरींनी पहिनेचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. त्यामुळे रविवारी (ता. २३) या परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी केली होती. (Monsoon Tourism Drizzling rain bloomed with rain Crowded due to weekend nashik)

त्र्यंबकेश्‍वर रोडवरील पहिने, मोखाडा रोडवरील दुगारवाडी तर, इगतपुरी परिसरातील अशोक फॉल्स ही ठिकाणे पावसाळी पर्यटनस्थळे म्हणून प्रसिद्ध आहे. दीड- दोन महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या मध्यानंतर नाशिक परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे.

तर, त्यामुळे पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्‍वर- इगतपुरी या डोंगर रांगामध्येही गेल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्याने डोंगर दऱ्यातील धबधबे वाहू लागले आहेत. घाटमाथ्यावरील ओहोळ- नाल्यांनाही खळाळून पाणी वाहू लागले आहे.

त्यामुळे या पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईसह नाशिकच्या आसपासचे पर्यटकांनी वीकएंडसाठी रविवारी घाटमाथा गाठला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील ब्रह्मगिरी डोंगर पावसाळी ढगांनी झाकोळलेले पाहून पर्यटकांना उत्साह आणखीच दुणावत होता.

तर, डोंगर रांगातून खळखळाट करीत पांढऱ्या शुभ्र पाण्याच्या धारांचे धबधबे पाहून पर्यटक आकर्षित होणार नाही तर नवलच. याच निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी रविवारी तरुणांसह आबालवृद्धांनी पहिने परिसरात तोबा गर्दी केली होती.

या पहिने रस्त्यावरील डोंगरातून धो- धो पडणाऱ्या धबधब्याच्या दिशेने चिखलातून वाट काढत पर्यटक उंच कपारीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत होते. तर, काही ठिकाणी ओढ्यात खळाळणाऱ्या पाण्यात पर्यटक डुबकी मारत आनंद लुटत होते.

यात प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुणाईचा उत्साह अधिक होता. तर, काही कुटुंबीयही आपल्या चिमुकल्या मुलांसह वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी आलेले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Tourists
Nashik News: डिंगरअळी चौकातील वाडा कोसळला; सुदैवाने दुर्घटना नाही

रिमझिम पावसाच्या सरीमध्ये भाजलेले मक्याचे कणीस खाण्याचाही आनंद पर्यटक घेत होते. तर काही पर्यटक चहाच्या एका घोटासह गरमागरम भज्यांचाही आस्वाद घेत निसर्गाचा आनंद घेत होते.

सेल्फीसाठी जीवही धोक्यात...

पहिने रस्त्याच्या एका बाजूला डोंगर रांग, तर दुसऱ्या बाजूला उताराची कपारी व काहीशी दरीही आहे. अशा ठिकाणी काही तरुणाई धोकादायकरीत्या उभे राहत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत होते.

त्यात रिमझिम पावसासह वाराही असल्याने त्यातून मोठी दुर्घटनाही घडू शकते. परंतु तरीही जीव धोक्यात घालून तरुणाईला सेल्फीचा मोह आवरत नव्हता. तसेच, ओढ्याचे पाणी कमी असले तरी काही कुटुंबीय अत्यंत निष्काळजीपणे त्यात वावरत होते.

त्यातूनही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यातच, याठिकाणी एक डोह असून दोन वर्षांपूर्वी याच डोहात तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता.

Tourists
Monsoon Tourism: पहिने रोडवर वाहनांची होईना चेकिंग; पोलिस बंदोबस्त तरी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com