नाशिक- जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पर्वतक्षेत्रातील धबधबे खळखळून वाहत आहेत. रविवारी (ता. ६) सुटी असल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिनेसह सर्वच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गर्दी उसळली होती. यामुळे त्र्यंबकेश्वर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.