Nashik : 50 हजारावर विद्यार्थ्यांना मासिक पासचे नियोजन

Citylinc
Citylincesakal

नाशिक : तोट्याच्या मार्गावरील बस बंद करणाऱ्या सिटीलिंकने (Citylinc) आता तोटा कमी करण्यासाठी मासिक पास देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शैक्षणिक वर्षाला (Education year) सुरवात झाल्याने शहर परिसरातील पन्नास हजारावर विद्यार्थ्यांना मासिक पास (Monthly Pass) देऊन परिवहन सेवेशी जोडण्याचे नियोजन केले आहे. (Monthly pass planning for over 50000 students by Citylinc Nashik News)

महानगर परिवहन सेवेच्या २०३ बस असून, त्यातील ४८ डिझेल व १५५ सीएनजी बस आहेत. प्रत्येक बसचा प्रतिकिलोमीटर चालविण्याचा खर्च हा ४२ रुपये अपेक्षित आहे. तो वाढल्याने सरासरी ३ रुपये प्रतिकिलोमीटर खर्च वाढला आहे.

सहाजिकच करार करतेवेळी डिझेलचे दर प्रतिलिटर ६२ रुपये होते. सध्या हेच दर १०० रुपये झाले. ५४ रुपये किलोचा सीएनजी ९० रुपयांपर्यंत पोचला. त्यामुळे बस चालविण्याचा आस्थापना खर्च वाढला आहे. मुळातच करारात महापालिकेने दर महिन्याला पाच कोटी रुपये तोटा सोसण्याची अटीची तरतूद असलेल्या या सेवेच्या बस फेऱ्या जेवढ्या वाढतील तेवढा तोटा आपसूकच वाढतो. तपोवन ते बारदान फाटा, आर्मी पब्लिक स्कूल ते घरकूल योजना यासह काही मार्गावरील फेऱ्यामुळे तोटा वाढला आहे.

पाईपने सीएनजी दिवास्वप्नच

बसला नियमित पुरेसा सीएनजी मिळेल, अशी सीएनजी कंपनीची हमी असली तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही पाइपलाइन दूर टँकरने येणाऱ्या एका पंपावर सीएनजी भरावा लागतो. त्यामुळे दीडशेवर बस रोज तपोवन आणि नाशिक रोड भागातून पाथर्डी भागात सरासरी ४० किलोमीटरचा प्रवास करतात. केवळ सीएनजी भरण्यासाठी रोज प्रत्येक बसला सरासरी ४० किलोमीटर विनाकारण रिकामी बस फिरवावी लागत असल्याने रोजचा दीड लाखांच्या आसपासचा खर्च हा निव्वळ डोकेदुखी आहे. त्यात पंपावरील साधारण सहा तास बसला रांगेत उभे राहावे लागते. तर प्रेशर ही तिसरी समस्या आहे. त्यातून अनेकदा सीएनजी संपला म्हणून रस्त्यात बंद पडणाऱ्या बस ओढून आणाव्या लागतात. नुकतेच दिंडोरी मार्गावरुन अशीच एक बस ओढून आणावी लागली.

फुकट्यांचा त्रास

परिवहन सेवेला फुकट्या प्रवासाचा मोठ्या प्रमाणावर त्रास आहे. त्यात अनेक वाहक पैसे घेऊन तिकीट देत नाही, असेही पुढे आले आहे. त्यात, आतापर्यंत ८१ वाहक आर्थिक बेशिस्तीमुळे निलंबित केले आहेत. तर ८५०० फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी परिवहन समितीने आता प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न देणाऱ्या वाहकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.

तोट्याची कारणे

- सीएनजीसाठी प्रत्येक बसचा ४० किलोमीटर प्रवास

- सीएनजीसाठी प्रत्येक बसला ९०० रुपये खर्च

- पेट्रोल दरात घटले सीएनजीचे दर मात्र जैसे थे

- पाइपलाइनऐवजी पारंपरिक टँकरने सीएनजी

* उपाययोजना

- तोट्याच्या ४४ मार्गावरील बस फेऱ्या बंद

- यापुढे फक्त इलेक्ट्रिक बसचीच खरेदी

- मासिक पासधारकांची संख्या वाढविणार

- दंडात्मक कारवाईसह फुकट्यांचा शोध

Citylinc
महाज्‍योतीतर्फे 100 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

"शैक्षणिक वर्षात शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गर्दी वाढेल. ४५ ते ५० हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांना मासिक पासने जोडून घेण्याचे सिटीलिंक प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी सध्या ८ पास वितरणाचे केंद्र सुरू करण्यात आले असून, लवकरच मासिक पास वितरण केंद्राची संख्या १८ पर्यंत वाढविली जाणार आहे."

- मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक

Citylinc
Nashik : मोबाईल चोर बाप- लेकांना पोलिसांकडून रेल्वेतच अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com