तत्कालीन पालिकेचे रूपांतर होऊन १७ डिसेंबर २००१ ला मालेगाव महापालिका स्थापन झाली. जवळपास सहा महिने प्रशासक राजवट होती. महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक होऊन १५ जून २००२ ला निहाल अहमद यांना मालेगावचे पहिले महापौर होण्याचा मान मिळाला. महापालिका होऊन २३ वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही.