ST Free Ride Scheme : 2 कोटीहून अधिक ज्येष्ठांनी घेतला ST बसच्या मोफत प्रवासाचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC Free Ride Scheme for old age people

ST Free Ride Scheme : 2 कोटीहून अधिक ज्येष्ठांनी घेतला ST बसच्या मोफत प्रवासाचा लाभ

मालेगाव (जि. नाशिक) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना शिंदे व फडणवीस सरकारने मोफत प्रवास देऊ केला होता. राज्यातील सर्व बसमधून ८७ दिवसात दोन कोटी ८ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवास करून एसटीला भरभरून प्रतिसाद दिला. या उपक्रमाचे राज्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. (More than 2 crore senior citizens avail benefit of free ride on ST buses Nashik News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Nashik Winter Update : ओझरसह परिसर गारठला; पारा 5.7 अंशावर

२५ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये मोफत प्रवासाची घोषणा केली होती. या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेची सुरवात २६ ऑगस्टपासून राज्यातील सर्व बसमध्ये झाली. २६ ऑगस्ट ते २० नोव्हेंबर २०२२ या ८७ दिवसांच्या कालावधीत राज्यातून दोन कोटी ८ लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाच्या लाभ घेतल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

राज्यात एसटीच्या १५ हजार ५०० बस शहराला ग्रामीण भागाशी जोडतात. राज्यात २४७ आगार व ५७८ बसस्थानक आहे. बसमध्ये ३३ टक्क्यांपासून ते ज्येष्ठांना शंभर टक्के सवलत दिली जाते. दिवाळीच्या सुट्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी पर्यटनस्थळ, धार्मिकस्थळ, दवाखान्याच्या कामानिमित्त मोठी शहरे गाठली. त्यामुळे हा आकडा वाढला आहे. लालपरी बस ही ग्रामीण भागाला शहराशी जोडणारी महत्वाच्या कणा ठरली आहे. एसटी बसमधून रोज लाखो प्रवासी ये- जा करतात. यात शाळेतील मुले, ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिकांसह अनके नागरिक लाभ घेतल्याचे श्री. चन्ने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : एक्स्प्रेसमधून चोरलेला Mobile, Laptop हस्तगत

टॅग्स :NashikMSRTCold age people