Nashik: ऐका...हो...ऐका, पुलाला भगदड पडल्याने रहदारी बंद! शेतीशिवारातील शेतकऱ्यांसह अनेक गावांचा संपर्क तुटला

mosam river Bridge Collapse
mosam river Bridge Collapseesakal

अंबासन, (जि.नाशिक) : ऐका...हो...ऐका, गावातील मोसम नदीपात्रातील पुलाला भगदड पडल्याने पुल बंद, येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून ध्वनिक्षेपकातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हरणबारी धरण परिक्षेत्रात दमदार पाऊस बरसल्याने नदीपात्र खळखळून दुथडी पुरपाणीने वाहत आहे.

पुलाला भगदड पडल्यामुळे अंबासन गावाला जोडणाऱ्या गावांसह शेतीशिवारातील शेतकऱ्यांचा संपर्क तुटला असून संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणानेच पुलाला भगदड पडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. (mosam river Bridge Collapse Stops Traffic Many villages lost contact with farmers in agricultural outskirts heavy rainfall nashik)

  गेल्या दीड ते दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजाने तालुक्यात दमदार हजेरी लावली. हरणबारी धरणातून शुक्रवार (ता.८) पाच हजार पाचशे क्युसेकने मोसम नदीपात्रातून पुरपाण्याचा विसर्ग करण्यात आला होता त्यानंतर सायंकाळपर्यंत सात हजार सातशे पुरपाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता.

पहाटेपासून प्रवाहित होत असलेले पुरपाणी कमी होऊन शनिवार (ता.९) बारा वाजेच्या सुमारास तीनहजार एकशे अठ्ठावीस क्युसेकने मोसम नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली.

यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा संबंधित विभागाकडून देण्यात आला होता. मोसम नदीपात्रात आलेल्या पुरपाण्यामुळे छोटे-छोटे फरची पुल पाण्याखाली गेले होते तर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नदीकाठावरील विहिरीमध्ये पुरपाणी गेल्याने पाणी दूषित झाल्याने नागरिकांना घरातील साठवलेले पाणी जपून वापरण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

mosam river Bridge Collapse
Nashik Rain Update: अखेर गोपाळकाल्याने फुटली पावसाची दहीहंडी! जिल्हाभर पावसाची धूव्वाधार बॅटिंग

दरम्यान पुरपाण्यामुळे अंबासन येथील नदीपात्रातील पुलाच्या एका बाजुचा भराव वाहून गेल्याने भगदड पडली आहे.

यामुळे गावाला जोडणा-या गावांसह शेतीशिवारातील शेतकऱ्यांचा संपर्क तुटला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या ध्वनिक्षेपकातून धोकादायक ठरत असलेला पुल पूर्णतः बंद करण्यात आला आहे. 

प्रशासनाच्या हलगर्जीपणानेच पुलाला भगदड 

मोसम नदीपात्रात असलेल्या पुलाला मागील वर्षी एका बाजूस काही प्रमाणात पुरपाण्यामुळे भगदड पडली होती स्थानिकांनी अनेक वेळा संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी केली होती.

या ठिकाणी राजकीय नेत्यांसह संबंधित विभागाच्या आधिका-यांनी पाहणी करून आश्वासन दिले होते. मात्र आश्वासन हवेतच विरल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

संबधित विभागाने दखल घेऊन पुलाला संरक्षण कठडा बांधला असता तर पुल सुस्थितीत राहिला असता अशी चर्चा यादरम्यान नागरिकांमध्ये सुरू होती. प्रशासन मोठा अपघात झाल्यावरच जागे होईल काय अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत होती.

mosam river Bridge Collapse
Nashik Rain News : पाऊस आला; पण खरीप गेला...! जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; धरणांमधून विसर्ग सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com