डबक्यांमुळे डासांचा उच्छाद; धूर फवारणीची मागणी

Water puddles on road in front of Kalidas Kala Mandir.
Water puddles on road in front of Kalidas Kala Mandir.esakal

जुने नाशिक : रहिवासी भागांसह विविध भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये (Potholes) पावसाचे पाणी साचून डबके (Puddles) तयार झाले आहेत. शिवाय पाण्याने बऱ्याच ठिकाणी कचरा कुजल्याने डासांची (mosquito) पैदास वाढली आहे.

त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. औषध आणि धूर फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (mosquito breeding due to puddles Smoke spray demand nashik Latest Marathi news)

गेल्या काही दिवसापासून शहरात सतत सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे. स्मार्टसिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी केलेले खड्डे वेगळे.

यात पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून डबके तयार झाले आहेत. असे हे डबके आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यासाठी निमंत्रण देत आहे. साचलेले पाणी आणि विविध ठिकाणी पडून असलेला कचरा यावर पावसाचे पाणी पडून कचरा कुजला आहे.

Water puddles on road in front of Kalidas Kala Mandir.
काय चाललय पक्षात? : धनुष्यबाणासाठी शिवसेनेची लढाई

असे दोन्ही ठिकाण डास मच्छर उत्पत्तीचे केंद्र ठरत आहे. डासांमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक लहान- मोठे क्लिनिक, रुग्णालय सध्या रुग्णांनी हाउसफुल असल्याचे दिसून येत आहे.

इतकेच नाही तर कुजलेल्या कचऱ्यामुळे डासांचे प्रमाण तर वाढलेच आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रहिवाशांना यामुळे आरोग्याचा त्रास जाणवत आहे. डासांपासून बचावासाठी पावसाळी गारट्याच्या वातावरणातही नागरिकांना पंखा लावण्याची वेळ आली आहे.

तर काहींनी मच्छरदाणीचा वापर सुरू केला आहे. यापुढे आणखी भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी औषध फवारणी करावी. तसेच, वेळोवेळी धूर फवारणी करावी. डास उत्पत्ती केंद्र असलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, ​अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

"खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यासह ड्रेनेजच्या सांडपाण्यात गटारामध्ये औषध फवारणी करण्यात यावी. रस्त्यावर पडलेला पाळापाचोळा कचरा कुजल्यानेही डासांचे प्रमाण वाढत आहे. अशा कचऱ्याचा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावा." - मोहसीन पठाण, नागरिक

Water puddles on road in front of Kalidas Kala Mandir.
Nashik : पोलिस आयुक्तालयाकडून शहरात मनाई आदेश लागू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com