वडनेर दुमाल्यात २५८ किलो मोतीचूर लाडू जप्त

वडनेर दुमाल्यात २५८ किलो मोतीचूर लाडू जप्त
Published on: 
३०-२ वडनेर दुमालात एफडीएकडून २५८ किलो मोतीचूर लाडू जप्त ‘मे. श्री बालाजी लाडू’चे परवाना निलंबित सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नाशिक विभागात विशेष तपासणी मोहीम अधिक तीव्र केली असून, वडनेर दुमाला येथील ‘मे. श्री बालाजी लाडू’ या आस्थापनेवर धडक कारवाई करीत तब्बल २५८ किलो संशयित मोतीचूर लाडूचा साठा जप्त केला आहे. तसेच अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. सहआयुक्त मंगेश माने व सहायक आयुक्त (अन्न) ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. ४) ही कारवाई करण्यात आली. ​वडनेर गेट येथील शिवाजी पुतळ्याजवळ असलेल्या ‘मे. श्री बालाजी लाडू’ या आस्थापनेची एफडीएच्या पथकाने अचानक पाहणी केली. अन्नपदार्थांची निर्मिती आणि साठवणूक अत्यंत अस्वच्छ वातावरणात होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तयार करण्यात येत असलेले मोतीचूर लाडू निकृष्ट दर्जाचे असून, त्यात विहित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात कृत्रिम अन्नरंगाचा वापर केला जात असल्याचा संशय बळावला. त्यामुळे पथकाने घटनास्थळावरून ६४ हजार ५०० रुपये किमतीचा २५८ किलो मोतीचूर लाडूचा साठा जप्त केला. गंभीर त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दे व श्रद्धा राहिंज यांच्या पथकाने केली. ---------------- नागरिकांना आवाहन सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी आगामी काळातही अशा कारवाया नियमित सुरूच राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही संशय असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. तसेच सर्व अन्न व्यावसायिकांनी परवाना घेऊनच व्यवसाय करावा व अन्न सुरक्षा मानकांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले आहे. फोटो :H34564 नाशिक : वडनेर दुमाला येथे कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला मोतीचूर लाडूचा साठा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.