धुळे ः टुडे ३ साठी
--
सूचना ः कृपया आतंरजातीय विवाह अनुदानाची बातमी पेन्डींग ठेऊन.....आजची ही हॅपनींग बातमी घ्यावी...
--
फोटो क्रमांक ः 34489
धुळे : साक्री रोडवरील रूंदीकरणात स्लॅब कोसळलेला मोती नाला पूल.
--
मोतीनाला पुलस्थळी नवा स्लॅप कोसळला
-
साक्री रोडवर निकृष्ट कामाची तक्रार; भारतीय संविधान सेनेचा आक्रमक पवित्रा
-
किंवा
-
मोतीनाला पुलाचा नव्याने टाकलेला स्लॅप कोसळला
-
साक्री रोडवर निकृष्ट कामाची तक्रार; भारतीय संविधान सेनेचा आक्रमक पवित्रा
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : शहरातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या साक्री रोडवरील मोती नाला पूल रुंदीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने बुधवारी (ता. ४) दुपारी पुलाचा नव्याने टाकला गेलेला स्लॅप कोसळला. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी भविष्यातील संभाव्य मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. याप्रकरणी दोषी कंत्राटदार आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भारतीय संविधान सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद लोंढे यांनी केली आहे.
श्री. लोंढे यांनी निवेदनात म्हटले आहे, की साक्री रोडवरील मोती नाल्याच्या पूल रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हा मार्ग अत्यंत व्यस्त असून येथून विद्यार्थ्यांच्या बसेस, रुग्णवाहिका आणि शेकडो नागरिक व वाहनांची सतत वर्दळ असते. अतिसंवेदनशील आणि मध्यवर्ती भागातील या पुलाचे काम निकषानुसार होणे अपेक्षित होते. मात्र, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुलासाठी टाकलेला नवीन स्लॅप कोसळला. कामगार उपस्थित नसताना ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. जर हा पूल चालू वाहत्या वर्दळीत कोसळला असता, तर निष्पापांच्या जीवावर बेतले असते, अशी भीती व्यक्त होत आहे.
पुलाच्या कामाची सुरुवात झाल्यापासूनच भारतीय संविधान सेनेने संबंधित उपअभियंता नितीन पवार, लोकरे आणि कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांना तोंडी स्वरूपात वारंवार सांगितले होते की पुलाच्या पिलर्स आणि लोखंडी सांगाड्यामध्ये नियमानुसार योग्य साहित्य वापरले जात नाही. मात्र, या गंभीर तांत्रिक बाबींकडे संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप आहे. या पुलाचे अधिकृत कंत्राट मे. ए. बी. वाघ या फर्मच्या नावाने घेण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात या कामाची अंमलबजावणी मिलिंद मुडावतकर यांच्याकडून केली जात आहे. निकषांना आणि मानदंडांना बगल देऊन निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे हा स्लॅप कोसळल्याचे स्पष्ट होत आहे.
१४-१
संविधान सेनेच्या मागण्या
तसेच याच परिसरातील मुख्य पाईपलाईन फुटल्याने मागील काही महिन्यांपासून पिण्याचे पाणी वाया जात असून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे, याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकरणी निकृष्ट कामाबाबत उपअभियंता पवार, श्री. लोकरे आणि कार्यकारी अभियंता पाटील यांची शासकीय चौकशी केली जावी. अधिकृत कंत्राटदार, उपकंत्राटदार, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. पुलामध्ये वापरलेल्या साहित्याचा खरा दर्जा समोर येण्यासाठी तज्ज्ञांमार्फत संपूर्ण पुलाचे निष्पक्ष तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या दोषींवर वैयक्तिक वेतनातून व मालमत्तेतून वाया गेलेला खर्च वसूल करावा. फुटलेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करून दूषित पाणीपुरवठा व पाणी गळती थांबवावी. या मागण्यांनुसार ठोस कारवाई झाली नाही, तर जनहितार्थ आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मंत्रालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन छेडण्यात येईल, असेही श्री. लोंढे, अभियंता रवी पवार, आबा अमृतसागर, गोपाल शिरसाट, भय्या वाघ, चिंतामण थोरात, किरण भालेराव आदींनी म्हटले आहे.