वणी, लखमापूर- नाशिक-सुरत रेल्वेमार्गाबरोबरच कोरोनाकाळात बंद केलेल्या रेल्वेगाड्या व रद्द केलेले रेल्वे थांबे पूर्ववत करण्याची मागणी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत केली आहे..नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिंडोरी मतदारसंघातील रेल्वेविषयक प्रश्न व शिर्डी-नाशिक-सुरत रेल्वेच्या मागणीसाठी खासदार भास्कर भगरे यांनी भेट घेतली. या वेळी खासदार भगरे यांनी शिर्डी-नाशिक-सुरत हा रेल्वेमार्ग झाल्यास महाराष्ट्र व गुजरात राज्याचीदळवणवळ सेवेला चालना मिळेल..सुरत व नाशिक हे दोन प्रमुख व्यापारी शहराबरोबरच येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व सापुतारा या पर्यटनस्थळावर गुजरात राज्यातून हजारो भाविक तीर्थाटन व पर्यटनासाठी येतात. तर पुणे, नाशिक, अहिल्यानगर येथून सुरत, अहमदाबाद येथे उद्योग व्यवसायासाठी व्यापारी, शेतकरी यांची रेलचेल, तसेच शेतीमाल व इतर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हा मार्ग झाल्यास भाविक, पर्यटक, शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यावसायिक यांना फायदेशीर ठरेल. .शिवाय सुरगाणा, दिंडोरी, कळवण या आदिवासी तालुक्यांचा विकास व रोजगार उपलब्धतेसाठी लाभदायक ठरू शकेल. तसेच कोविडकाळात मनमाड- मुंबई मार्गावरील बंद केलेल्या रेल्वेगाड्या, काही बंद केलेले रेल्वे थांबे पूर्ववत करून मतदारसंघातील रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, पर्यायी मार्गे यांची रखडलेली कामे, याबाबतही खासदार भगरे यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून सोडविण्याची मागणी केली आहे. .नाशिक-शिर्डी-सुरत रेल्वेमार्गाच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. या मार्गामुळे भाविक, पर्यटक यांच्यासह सर्व घटकांना फायदा याबाबत चर्चा झाली. लवकरच याबाबत काहीतरी मार्ग नक्की काढू, असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे.-भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.