सटाणा- बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण डावा, उजवा कालवा, तसेच केळझर धरण चारी क्रमांक आठचे काम गेल्या ४० वर्षांपासून रखडले आहे. प्रश्न तोच असला, तरी तो विचारणारी माणसे व पिढी बदलली. संबंधित अधिकारी बदलतात. मात्र, प्रश्न काही सुटत नाही. बागलाण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे. त्यासाठी शासन कोणाचेही असो, मंत्री स्तर व थेट संसदेत पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावून जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन, असे मत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी मांडले.