नाशिक- कर्मचारी राज्य विमा महामंडळ (इएसआयसी) ही केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून सातपूर परिसरातील रुग्णालयात अपुरी कर्मचारी संख्या, सोयी-सुविधांचा अभाव यामुळे या रुग्णालयाची दुरावस्था झाली असून कामगार-कर्मचारी रुग्णांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो.