नाशिक- बियाणे, रासायनिक खते, शेती अवजारांवरील २८ टक्के जीएसटी केंद्र सरकारने रद्द करावा. तसेच, शेती कर्जावरील व्याज केंद्र व राज्य सरकारने मिळून माफ करावे आणि मुद्दल शेतकरी भरतील, यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याची ग्वाही धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिली.