MPSC Exam
sakal
MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (ता. ४) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ चे आयोजन केले होते. एकूणच या परीक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम स्वरूपाची होती. मात्र सामान्य ज्ञान विषयाचे प्रश्न सोडविण्यासाठी भरपूर वेळ लागला. परीक्षेला सहा हजार ०९९ परीक्षार्थ्यांनी दांडी मारली. तर १३ हजार ४८७ उमेदवार उपस्थित होते.