MPSC Non Gazetted Exam : अराजपत्रित सेवा परीक्षेच्‍या जागांमध्ये वाढ; आता इतक्या जागांवर होणार भरती

MPSC Exam
MPSC Examesakal

MPSC Non Gazetted Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्‍त पूर्वपरीक्षा २०२३ च्‍या जागांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. (mpsc Non Gazetted exam seats increase nashik news)

यापूर्वी आठ हजार १६९ जागांवर भरती केली जाणार होती. यामध्ये वाढ केली असून, आठ हजार २१७ जागांवर भरती केली जाणार आहे.

आयोगातर्फे या वर्षी ३० एप्रिलला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्‍त पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेकरिता जानेवारी महिन्‍यात प्रसिद्ध केलेल्‍या जाहिरातीत आठ हजार १६९ जागांचा समावेश केला होता.

शासनाकडून अतिरिक्त‍ मागणीपत्र प्राप्त झाल्‍यास पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्‍या संबंधित विभागांच्‍या सूचनेनुसार बदल होण्याची शक्‍यता लक्षात घेता सुधारित जागांचा तपशील जाहीर केला आहे. त्‍यानुसार आता विविध संवर्गातील आठ हजार २१७ पदे भरली जाणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MPSC Exam
MPSC Success Story : प्रतिकूल परिस्थितीत वर्षा साळुंकेचे स्पर्धा परीक्षेत यश

अशी आहे सुधारित जागांची स्‍थिती

सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) एकूण ७० जागा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय आठ जागा, राज्‍य कर निरीक्षक १५९ जागा, पोलिस उपनिरीक्षक ३७४ जागा, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक ४९ जागा, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागातील दुय्यम निरीक्षक सहा जागा, कर सहाय्यक ४६८ जागा, तांत्रिक सहाय्यक एक जागा, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग ४८ जागा, नाशिकचे विभागीय माहिती कार्यालय पाच जागा,

लातूर येथील विभागीय माहिती कार्यालय दोन जागा, कोकण विभाग माहिती कार्यालय सहा जागा, अमरावती विभागीय माहिती कार्यालय दोन जागा, तसेच औरंगाबाद व नागपूर विभागीय माहिती कार्यालयासाठी प्रत्‍येकी चार जागा, मुंबईतील लोकायुक्‍त व उपलोकायुक्‍त कार्यालयातील १६ जागा, कृषी आयुक्‍तालयातील ५८ जागा,

नागपूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील ४६ जागा, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय अमरावती २९, छत्रपती संभाजीनगर ४०, लातूर १८, नाशिक ५५, पुणे ४४, कोल्‍हापूर २२, ठाणे ६७, तसेच पशुसंवर्ध आयुक्‍त कार्यालय ३९, मत्‍स्‍य व्‍यवसाय विभागातील ३८, पुण्यातील सहकार आयुक्‍त व निबंधक सहकारी संस्‍था २६ जागा, सहकारी संस्‍था विभागीय सहनिबंधकाकरिता कोकण विभाग २५,

पुणे विभाग ३८, कोल्‍हापूर ३०, छत्रपती संभाजीनगर ३३, नाशिक ६६, लातूर ३६, अमरावती ३३, नागपूर ४३, मुंबई ३६ जागांचा समावेश आहे. सहकारी संस्‍थेतील विभागीय सहनिबंधक येथील लेखापरीक्षण विभागातील २९, पुणे विभाग १७, कोल्‍हापूर ९, छत्रपती संभाजीनगर १९, नाशिक ८ यांच्‍यासह जिल्‍हाधिकारी कार्यालयातील व अन्‍य शासकीय स्‍तरावरील जागांचा समावेश आहे.

MPSC Exam
MPSC Skill Test Result : दोनदा कौशल्‍य चाचणी घेऊनही लागेना निकाल; आयोग सहनशीलतेची चाचणी घेत असल्‍याची टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com