सातपूर- राज्य सरकारने अन्न औषध प्रशासन विभागातील अन्नसुरक्षा अधिकारींची भरती प्रक्रिया नुकतीच राबविली. एमपीएससी’ तर्फे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १८९ अधिकारींची अंतिम निवड केली आहे. यात नाशिक विभागासाठी २५ अधिकारी नियुक्त झाले आहेत. दरम्यान यामुळे या विभागातील कारभार गतिमान होण्यास मदत होणार आहे.