MPSC Recruitment : तज्‍ज्ञ डॉक्‍टर दाखल होणार सार्वजनिक आरोग्‍यसेवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Advertisement

MPSC Recruitment : तज्‍ज्ञ डॉक्‍टर दाखल होणार सार्वजनिक आरोग्‍यसेवेत

नाशिक : दीर्घ काळापासून खोळंबलेली भरतीप्रक्रिया व कोरोना महामारी काळात डॉक्‍टरांची कमतरता प्रकर्षाने जाणवली होती. अशात सार्वजनिक आरोग्‍यसेवेत तज्‍ज्ञ डॉक्‍टर लवकरच सहभागी होऊ शकतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रियादेखील सुरू झालेली आहे. (MPSC Recruitment Specialist Doctors will join Public Health Service nashik news)

राज्‍य शासनाच्‍या विविध विभागांतील वेगवेगळ्या संवर्गातील पदांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरतीप्रक्रिया राबविली जाते. त्‍यानुसार सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या नियंत्रणाखाली येणाऱ्या राज्‍य कामगार विमा योजना आयुक्‍तालयांतर्गत तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या विविध पदांसाठी मागणी नोंदविलेली आहे. ही पदे आयोगामार्फत भरली जाणार आहेत. चाळणीप्रक्रिया व मुलाखतीतील कामगिरीच्‍या आधारे ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.

१९ जानेवारीपर्यंत मुदत

इच्‍छुक व पात्र उमेदवारांना त्‍यांच्‍या पात्रतेनुसार उपलब्‍ध पदांवर अर्ज करता येईल. त्‍यासाठी आयोगाच्‍या संकेतस्‍थळावर ऑनलाइन अर्जासह आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता व शुल्‍क भरण्याची मुदत १९ जानेवारीपर्यंत निश्‍चित केलेली आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Election News : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीसह 5 जागांसाठी 30 जानेवारीला मतदान

अशी आहेत उपलब्‍ध पदे

प्रशासन अधिकारी (गट-ब) संवर्गाची १५ पदे, तर गट ‘अ’च्‍या कान-नाक-घसातज्‍ज्ञ संवर्गाचे दोन पदे, मनोविकारतज्‍ज्ञ संवर्गातील एक, वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट संवर्गाच्या तीन पदांचा समावेश आहे. सीनिअर ॲनेस्‍थियासिस्ट संवर्गाचे पाच, सीनिअर रेडिऑलॉजिस्‍ट संवर्गाची तीन पदे, नेत्ररोगतज्ज्ञांची पाच पदे भरतीप्रक्रियेतून भरली जातील.

याशिवाय बालरोगतज्ज्ञ पाच पदे, स्त्रीरोग व प्रसूती शास्त्रज्ञ सात पदे, अस्थिव्यंग शल्यचिकित्सक संवर्गातील पाच पदे, शल्यचिकित्सकांची आठ पदे, सीनिअर फिजिशियन संवर्गाच्‍या देखील आठ पदांचा यात समावेश आहे.

हेही वाचा: Nashik News : पालकमंत्र्यांच्या घरासमोरील बिऱ्हाड आंदोलनात राजु शेट्टी सहभागी होणार!