
MPSC Success Story : अहिवंतवाडी (ता.दिंडोरी) येथील शिक्षक कन्येने आदिवासी मुलींमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिला क्रमांक मिळवीत महानगरपालिका उपायुक्तपदाला गवसणी घातली आहे. (MPSC Success Story Pournima gavit village of Dindori taluka stands first in tribal girls in state nashik)
पौर्णिमा गावित असे तिचे नाव असून एका खेड्या गावातून तिने हे यश मिळविले आहे. सप्तशृंगगड पायथ्याशी अहिवंतवाडी किल्ल्याजवळ अहिवंतवाडी हे गाव आहेत. येथील विठोबा शिवराम गावित हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत.
त्यांची कन्या पौर्णिमा ही नवोदय विद्यालयात शिकली. तिने राहुरी येथील कृषी विद्यापीठात बीएस्सी अॅग्रिकॅल्चरची पदवी, आयआयटी खरपूर येथे एमएस्सी अॅग्रिकॅल्चरची पदवी प्राप्त केली.
त्यानंतर एमपीएससी परिक्षा दिली. तीन वेळेस पौर्णिमा परिक्षा उत्तीर्ण झाली. २०२० साली ती मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली होती.
पण तिने ते नाकारून पुढे परिक्षा सुरु ठेवल्या. तिसऱ्या प्रयत्नात ती महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी निवड झाली असून आदिवासी समाजाच्या मुलीसाठी तिने एक आदर्श निर्माण केला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
स्पर्धा परीक्षा देताना प्लॅन बी आवश्यक....
यश मिळाल्यावर पौर्णिमा गावित म्हणाली की, अतिशय आनंद होत आहे, आई- वडिलांच्या स्वप्नांना साकार करण्याचे बळ मिळाले. म्हणून आज हे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा मन लावून अभ्यास केला, ध्येय निश्चित ठेवले तर यश हमखास मिळते.
आजच्या घडीला अनेक विद्यार्थी आई- वडिलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी जिवाच रान करत असतात. मात्र अपयश मिळतं असते. यासाठी विद्यार्थ्यांनी पहिल्यापासूनच प्लॅन बी ठेवणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना करियरसाठी अनेक क्षेत्र आहेत. त्यामुळे एमपीएससी करत असताना प्लॅन बी तयार ठेवणे क्रमप्राप्त आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा लागतो.
अशा विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.