Nashik News : महावितरणचा २४ तासांचा संप; वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे महत्त्वाचे पाऊल
Six Unions Declare 24-Hour MSEDCL Strike : महावितरणच्या ६ संघटनांनी २४ तासांचा संप जाहीर केला असला तरी नागरिकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. पर्यायी मनुष्यबळ, साधनसामग्री आणि नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत.
नाशिक रोड- महावितरणमधील २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांनी बुधवारी (ता. ९ जुलै) २४ तासांचा संप जाहीर केला आहे. या संपामुळे नागरिकांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरणने राज्यभरात आपत्कालीन नियोजन राबवले असून संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.