एम-सेट परीक्षेला ८३.६४ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती जळगावातील आठ केंद्रांवर परीक्षा शांततेत; ५१४ विद्यार्थी गैरहजर

एम-सेट परीक्षेला ८३.६४ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
जळगावातील आठ केंद्रांवर परीक्षा शांततेत; ५१४ विद्यार्थी गैरहजर
Published on: 
टुडे एकसाठी --------------- ‘एम-सेट’ला ८३ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ---------- आठ केंद्रांवर परीक्षा शांततेत; ५१४ विद्यार्थी गैरहजर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेली ३६वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (एम-सेट) रविवारी (ता. २५) जळगाव शहरातील एकूण आठ परीक्षा केंद्रांवर शांततेत पार पडली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या तीन हजार १४४ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ६३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ५१४ विद्यार्थी गैरहजर राहिले. एकूण विद्यार्थ्यांपैकी ८३.६४ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने जळगाव केंद्राचे संपर्क अधिकारी तथा कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी जळगाव शहरामधील आठ केंद्रांवर आवश्यक नियोजन करण्यात आले होते. सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडली. एम-सेट परीक्षा ही सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक पात्रता निश्चित करण्याच्यादृष्टीने महत्त्वाची मानली जाते. उच्चशिक्षण क्षेत्रात अध्यापनाची कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी या परीक्षेला विशेष महत्त्व आहे. यंदा जळगाव केंद्रावर १६.३६ टक्के विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com