ST Bus Revenue
sakal
वणी (नाशिक) - साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या श्री सप्तशृंग गडावरील नवरात्रोत्सव व कोजागिरी पौर्णिमा यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे एसटीच्या तिजोरीत तब्बल ४ कोटी ९४ लाख ५८ हजार ७०४ रुपयांची भक्कम कमाई झाली आहे. या दोन्ही यात्रांच्या काळात तब्बल ७ लाख २४ हजार १५३ भाविकांनी एसटीच्या सुलभ व सुरक्षित सेवेचा लाभ घेतला.