Nashik News: बसगाड्या धावतात फलकाविना! बस कोठून कोठे जाणार हे कळून येत नसल्याने प्रवाशांची अडचण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

handwritten name on the bus

Nashik News: बसगाड्या धावतात फलकाविना! बस कोठून कोठे जाणार हे कळून येत नसल्याने प्रवाशांची अडचण

मनमाड (जि. नाशिक) : नांदगाव तालुक्याच्या ठिकाणाहून ग्रामीण भागात येणाऱ्या अनेक बसवर गावाच्या नावाचा फलक लावलेला नसल्याने प्रवाशांची अडचण निर्माण होत आहे.

अनेक बसगाड्या फलकविना धावत आहे, तर काही गाड्यांवर चुन्याने नाव लिहून काम केले जात आहे. त्यामुळे बस कोठून आली आणि कोठे जाणार, हे कळून येत नसल्याने आपल्या घरी पोचण्यासाठी प्रवाशांची अडचण होत आहे. (Bus run without sign boards at manmad passengers suffering Nashik News)

सामान्यांचा अविभाज्य घटक झालेली, गोरगरिबांच्या पाल्यांना शिक्षणासाठी गाव-खेड्यातून शहरात नेणारी लालपरी शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे आज शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे. सोबतच महामंडळातील काही उदासीन अधिकाऱ्यांची लापर्वाही याला तेवढीच कारणीभूत ठरत आहे.

वाहक-चालकांवर नियंत्रण नसल्याने ते मनात येईल त्या पद्धतीने वागताना दिसत आहे. याचा परिणाम फेऱ्यांच्या अर्निंगवर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या ठिकाणाहून गावखेड्यात येणाऱ्या-जाणाऱ्या बसवरील गावाचे नाव दर्शविणारे फलक अदृश्य झाले आहेत.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Ahirani Sahitya Sammelan : अहिराणीना डंका देसमा वाजाडना शे! खानदेश साहित्य संघाला निमंत्रण

 काही बसवर चुन्याने गावाचे नाव लिहिण्याचा नवा फंडा उदयास आला आहे. बसवर गावाचे नाव दर्शविणारे फलक नसल्याने संबंधित बस कोठून आली आणि कोठे जाणार आहे, हे प्रवाशांना कळत नाही.

नियोजित ठिकाणी जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना बऱ्याचवेळा संबंधित बस येऊन गेल्याचे कळत नाही. वाहक किंवा चालकाकडे बस कोठे जाणार, याची विचारणा करणाऱ्या प्रवाशांना नीट उत्तरे देण्याची तत्परतादेखील दाखविल्या जात नाही.

त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गल्लेलठ्ठ पगार घेणाऱ्या आगारप्रमुखांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. विभगा नियंत्रकांनी ही बाब गांर्भीयाने घेऊन आगारप्रमुखांसह बसच्या चालक-वाहकांना बसवर नामफलक लावण्यासह प्रवाशांसोबत सन्मानाने वागण्याच्या सूचना द्यावा, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.

हेही वाचा: Uddhav Thackeray Group : ठाकरे गटात पन्नास कार्यकर्त्यांचा प्रवेश! संजय राऊत यांच्याकडून स्वागत