MSRTC Bus Travel: 15 कोटी ज्येष्ठांकडून लालपरीची सवारी! लातूर विभागातील ज्येष्ठ नागरिक आघाडीवर

नातेवाइकांच्या भेटी, पर्यटन सुखकर झाल्याच्या प्रतिक्रिया
MSRTC old age people
MSRTC old age peopleesakal

MSRTC Bus Travel : राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना एसटीमध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवासाच्या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. ३५५ दिवसांत १४ कोटी ८३ लाख ९४ हजार ४९२ (जवळपास १५ कोटी) ज्येष्ठांनी एसटीची सफर केली आहे.

‘लालपरी’ पुन्हा ज्येष्ठांच्या पसंतीस उतरली. राज्यात लातूर विभागातील ज्येष्ठांनी योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला आहे. योजनेमुळे ज्येष्ठांचे नातेगोते, भेटी, पर्यटन व देवदर्शन अधिक सुखकर झाले. (MSRTC Bus Travel Lalpari ride from 15 crore seniors Senior Citizens of Latur Division at forefront nashik)

शासनाने ज्येष्ठांना मोफत, तर महिलांना बसमध्ये ५० टक्के प्रवासभाड्यात सवलत दिली आहे. या दोन्ही सवलतींमुळे राज्यभरातील बहुतांश एसटीमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी उसळते. लालपरीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.

एसटीतून रोज ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा गेल्या वर्षी २५ ऑगस्टला प्रारंभ झाला. ज्येष्ठांनी खेड्यातून शहराकडे दवाखाना, पर्यटन, धार्मिक स्थळ, उन्हाळी व दिवाळी सुट्यांमध्ये फिरण्यासाठी आनंद घेतला आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या दवाखान्यासाठी मोफत सवलत मिळाल्याने ज्येष्ठांची सोय झाली. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला २६ ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होणार आहे.

आतापर्यंत १४ कोटी ८३ लाख ९४ हजार ४९२ ज्येष्ठांनी मोफत प्रवास केला. राज्यातील लोकसंख्येपेक्षा जास्त ज्येष्ठांनी एसटीत प्रवास करून वेगळा इतिहास निर्माण केला आहे.

राज्यातील ३६ जिल्ह्यांतून लातूर जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवास करण्यात आघाडीवर आहेत. एसटीला ६८३ कोटी ८० लाख ८३ हजार ७८० रुपये रक्कम तिकिटापोटी सरकारने जमा केले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MSRTC old age people
Nashik News : ‘क्रोशा आर्ट’ माध्यमातून स्त्री- पुरुष समानतेचा संदेश; 30 बाय 45 इंच लोकरीचा राष्ट्रीय ध्वज

ही योजना ‘शिवशाही’सह इतर सर्व बसमध्ये राबविल्याने ज्येष्ठांना मोठा आधार मिळाला. बसमध्ये मोफत प्रवास झाल्यापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळांचे देवदर्शन करता आले, गरिबांसाठी ही योजना फलदायी असल्याचे सय्यद पिंप्री येथील ज्येष्ठ नागरिक एकनाथ ढिकले यांनी सांगितले.

"शासनाने अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, ६५ ते ७५ वर्षांदरम्यान वृद्ध तसेच महिलांना ५० टक्के तिकिटात सवलत दिली आहे. पर्यटन, देवदर्शन व नागरिकांच्या गाठीभेटी या सर्वांना शक्य होतात. त्यामुळे एसटीला सुगीचे दिवस आले आहेत. शासन एसटीला त्यांच्या हक्काचे पैसे देते. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर होत आहे."

- दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

"अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सोय करून राज्य शासनाने एसटीला ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या दररोज सरासरी पाच ते सहा लाख अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीच्या विविध प्रकारच्या बसमधून प्रवास करीत आहेत. अर्थात, त्यांचा हा उत्साहवर्धक प्रतिसाद म्हणजे आमच्यासाठी त्यांनी दिलेला आशीर्वाद आहे." - अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, मुंबई

MSRTC old age people
Chaggan Bhujabal: "ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावं ठेवत नाहीत"; भुजबळांचा भिडेंवर निशाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com