Nashik ST revenue
sakal
नाशिक: दिवाळीसणानिमित्त बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठीदेखील यंदाची दिवाळी गोड ठरली आहे. या हंगामात नाशिक विभागाला जादा बसगाड्यांच्या वाहतुकीतून १२ कोटी ९० लाख ४९ हजार ००६ रुपये उत्पन्न मिळाले आहे. हंगामी काळात एसटीने १५ लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. उत्पन्नाबाबत नाशिक विभागाचा राज्यात तिसरा क्रमांक आहे.