MSRTC UPI Payment
MSRTC UPI Paymentesakal

MSRTC News: एसटी प्रवासात आता सुटे पैशांची चिंता मिटली! प्रवाशांना करता येणार ‘UPI पेमेंट’; वाचा सविस्तर

वाहकांसाठी ‘ॲण्ड्रॉईड तिकीट इश्यू मशिन’!

नाशिक : प्रवासाला निघाल्‍यावर तिकीट काढताना बऱ्याच वेळा सुटे पैशांची समस्‍या उद्‌भवते. वाहक आणि प्रवाशांमध्ये बऱ्याच वेळा यामुळे वादाला तोंडदेखील फुटते. परंतु आता एसटीमध्ये प्रवास करताना सुटे पैशांची चिंता मिटली आहे.

महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाने डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदीचा पर्याय उपलब्‍ध केला आहे.

याअंतर्गत वाहकांसाठी ॲण्ड्रॉईड तिकीट इश्यू मशिन (ईटीआयएम) उपलब्‍ध केले आहे. त्यामुळे प्रवासी क्‍युआर कोड स्‍कॅन करून यूपीआय पेमेंटद्वारे तिकिटाचे पैसे अदा करू शकतील. (MSRTC worry of extra money in ST travel now over UPI Payments for passengers nashik)

यासंदर्भात महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाचे परिपत्रक जारी केले आहे. या पत्रकात नमुद केले आहे, की एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुटे पैशांची चिंता करण्याची गरज नाही.

डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून सर्व वाहकांसाठी अॅण्ड्राईड तिकीट इश्यू मशिन (ईटीआयएम) नव्‍याने सेवेत दाखल केल्‍या आहेत. या नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्युआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे.

मे. ईबीक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकार्याने महामंडळाला सर्व वाहकांसाठी नवीन अॅण्ड्राईडवर आधारित डिजिटलची सुविधा असणारी तिकीट मशिन उपलब्‍ध झालेली आहे.

सध्या सर्वत्र रोखीने व्‍यवहारांची संख्या घटत असल्‍याने काळाची गरज ओळखून महामंडळानेही डिजिटल व्‍यवहाराला चालना देण्याचे धोरण अवलंबले आहे.

MSRTC UPI Payment
Indian Post News: ज्येष्ठांचा ओढा टपाल खात्याकडे कायम! तरुणाईची पसंती मात्र शेअर्स, मॅज्युअल फंडाला

सर्व पर्याय राहणार उपलब्‍ध..

तिकिटाची रक्‍कम अदा करण्यासाठी प्रवाशांना त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध असलेल्‍या पेमेंट ॲपचा वापर करता येणार आहे. त्‍यानुसार फोन-पे, गुगल-पे यांसारख्या सर्व यूपीआय पेमेंटसाठी वाहकाकडे असलेल्या अॅण्ड्राईड तिकीट मशिनवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे पैसे अदा करता येतील.

यूपीआय पेमेंटद्वारे क्युआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून, जास्तीत जास्त प्रवाशांनी सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी महामंडळातर्फे केले आहे.

"नाशिक विभागातील सर्व बसमधून प्रवास करताना तिकिटासाठी डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्‍ध केली आहे. यामुळे सुट्यांचा प्रश्‍न मिटणार असून, प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा."

- अरुण सिया, विभाग नियंत्रक.

MSRTC UPI Payment
Nashik News: साहेब, दुष्काळाने होरपळलो, कांदा निर्यातबंदीने उद्ध्वस्त झालो; पाहणी दौऱ्यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com